या घरात तुला कुत्रही विचारत नव्हतं.. किरण माने विकासवर भडकला..

मुंबई: गेली काही दिवस 'गद्दार' हा शब्द महाराष्ट्रात वाऱ्यासारखा पसरला आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीमुळे प्रचलित झालेला हा शब्द बिग बॉसच्या घरात झालेल्या टास्क मध्येही ऐकू येत होता. म्हणून बिग बॉसने स्पर्धकांना एक असा टास्क दिला, ज्यामुळे आता घरात मोठा राडा झाला आहे.नुकताच बिग बॉसने एक टास्क दिला होता, ज्यामध्ये जो कोणी तुम्हाला गद्दार वाटत असेल त्याला हा बॅच लावायचा होता. या टास्क दरम्यान रुचिरा अपूर्वाला आणि अक्षय केळकर रोहित शिंदेला गद्दार ठरवतो. पण सर्वात मोठा धक्का मध्ये विकास त्याच्या लाडक्या दादाला म्हणजेच किरण मानेला गद्दार ठरवतो. हे पाहून सारेच चकित होतात. आजवर आपण पाहिले की घरात विकासला सर्वाधिक पाठिंबा किरण मानेने दिला होता. किरण त्याच्यासाठी संपूर्ण घराशी भांडला. पण कालच्या टास्कमध्ये विकासनेच त्याला गद्दार ठरवले आणि किरण माने दुखवला गेला. आजच्या भागात किरण आपला राग व्यक्त करताना दिसणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमो मध्ये विकास किरणची मनधरणी करताना दिसत आहे. त्यावर किरण म्हणतो, 'खेळायला कोणी शिकवलं तुला बिग बॉस? या घरात तुला कुत्र विचारत नव्हतं तेव्हा कोणी विचारलं तुला ? त्यावर विकास म्हणाला, तुम्हीचं... मग किरण माने म्हणाले, हे सांगायला काय जीभ जड झाली तुझी ? कानफडीत द्यायला हवी होती मी तुला.. तुझा माझा आता संबंध संपला...'काल झाल्या प्रकारानंतर किरण मानेने विकासशी संबंध तोडले आहे. पण विकास त्यांची मनधरणी करू शकेल का? की हा वाद अधिक चिघळेल ही आजच्या भागात कळेलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने