'अरे ही तर आमची वहिनी'! राखीनं केली सलमानची पोलखोल

मुंबई :  टीव्ही मनोरंजन विश्वातच नव्हे तर बॉलीवूडमध्ये देखील राखीनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राखीचं वागणं, बोलणं आणि तिचं भडकणं हे सारं काही तिच्या चाहत्यांना नवीन नाही. बिग बॉसचा टीआरपी जेव्हा कमी झाला होता तेव्हा त्या शो ला टीआरपी मिळवून दिला होता.आज राखीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयीच्या वेगवेगळया गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. राखी आणि सलमानचं नातं हे नेहमीच चर्चेत राहिलं आहे. भलेही सलमाननं कितीही राखीची फिरकी घेतली तरी तो तिच्या मदतीलाही बऱ्याचदा धावून गेला आहे. राखीच्या आईवर जेव्हा शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हा त्यानं मोठी मदत केली होती.राखीला सलमानविषयी खूप आदर आहे. ती त्याला भाऊ मानते. तिच्याविषयी कुणी काही बोललं तर त्याविरोधात लढतेही. कंगनानं जेव्हा सलमानवर टीका केली होती तेव्हा राखी ही एकमेव सेलिब्रेटी होती जिनं सलमानच्या बाजुनं प्रतिक्रिया दिली होती. आताही राखीनं सलमानच्या बाबत एका वेगळया गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

सलमान आणि त्याची नवी गर्लफ्रेंड युलिया वंतूर यांच्या रिलेशनशिपविषयी अनेकांना माहिती आहे. त्यांच्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले आहेत. असे असले तरी सलमाननं जाहीरपणे त्याविषयी कधीही वक्तव्य केले नाही. यासगळयात राखीची प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. त्यात राखीनं युलियाचा एक फोटो पाहून ही तर आमची वहिनी असे म्हणून सलमानचं सिक्रेट ओपन केलं आहे. राखीनं एक व्हिडिओ शेयर करत त्याला दिलेली कॅप्शन अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने