राजकीय हिंसाचाराचा सामना करू : बायडेन

वॉंशिंग्टन : लोकशाहीवरच्या हल्ल्याकडे आपण दुर्लक्ष करता येणार नाही. देशाच्या लोकशाहीला खोटेपणा आणि राजकीय हिंसेतून आपल्याला वाचवायचे आहे, असे आवाहन अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केले. राजकीय हिंसाचाराला अप्रत्यक्षपणे डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरत हिंसाचाराचा आपण सामना करू, असे ज्यो बायडेन म्हणाले.नॅन्सी पेलोसी यांच्या पतीवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत बायडेन म्हणाले, की माजी अध्यक्षांच्या खोटेपणामुळे दोन वर्षांत देशात राजकीय हिंसा आणि मतदारांना धमकी देण्यासारख्या प्रवृत्तीला हवा मिळाली आहे. डेमोक्रॅट्स, रिपब्लिकन आणि बिगर पक्षाच्या अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले हे सत्ता आणि फायदा मिळवण्यासाठी दिलेल्या खोट्या आश्‍वासनाची परिणती आहे.वारंवार खोटे वक्तव्य जात असल्याने देशात कट कारस्थान, द्वेष आणि हिंसाचार माजत आहे. धमकी आणि राजकीय हिंसेला घाबरणार नाही, हे बजावून सांगायला हवे. माजी अध्यक्षांनी २०२० मधील निकाल मान्य केला नाही आणि त्यानंतर देशात राजकीय हिंसाचाराला हवा मिळाली. हे एकप्रकारे अमेरिकी लोकशाहीवर हल्ले आहेत. ते जनतेने दिलेला कौल मान्य करण्यास तयार नाहीत. असे बायडेन यांनी स्पष्ट केले.

सध्या गर्व्हनर, संसद, ॲटर्नी जनरल आणि परराष्ट्र मंत्रालयापासून प्रत्येक पातळीवर निवडणुकीचे निकाल मान्य न करणारे उमेदवार उभे राहत आहेत. हा एकप्रकारे अमेरिकेत अराजकता माजविण्याचा हा मार्ग असून तो अनाकलनीय आहे. बायडेन यांनी एमएजीए (मेक अमेरिका ग्रेट अगेन) च्या घोषणेला पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांवरही टीका केली आणि वाढत्या राजकीय हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली. बायडेन यांनी निवडणूकीचे निकाल मान्य न करणाऱ्या उमेदवारांना मत देऊ नये, असे आवाहन ज्यो बायडेन यांनी केले­.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने