दिवसांपासून उपाशी असलेल्या ठणठणीत मेंढ्या गोल गोल का फिरतायेत?

मुंबई :  सोशल मीडियावर सध्या मेंढ्यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या मेंढ्या गेल्या १२ दिवसांपासून गोल रिंगण करून फिरत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर काही मेंढ्या या रिंगणाच्या मध्यभागी उभ्या आहेत. या अजब व्हिडिओ चीन मधील असून हा प्रकार नेमका कसा घडतोय याची माहिती अजून समोर आलेली नाही. तर यावर संशोधन सुरू असल्याचं संशोधकांनी सांगितलं आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अनेक मेंढ्या काही अंतर सोडून गोल गोल फिरताना दिसत आहेत. तर हे पाहून अनेक लोकं हैराण झाले आहेत. चीनमधील मंगोलिया येथील हा व्हिडिओ असून पीपल्स डेली चीन या वृत्तसंस्थेच्या ट्वीटरवरून हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आलाय. तर या मेंढ्या अशा गोल का फिरतात याचं अधिकृत कारण समोर आलं नसल्याची माहिती आहे.अधिक माहितीनुसार, या मेंढ्यांनी १२ दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. १२ दिवसांपासून उपाशी असलेल्या या मेंढ्या अजूनही ठणठणीत आहेत आणि अशा अवस्थेत त्या गोल गोल फिरत आहेत. एक प्रकारचा हा चमत्कारंच असल्याचं बोललं जातंय. तर संशोधकांकडून या प्रकाराचा शोध सुरू आहे.दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने