'जादुगार झाला'! आलियानंतर आता 'रुचा'ची गोड बातमी

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आलियानं दिलेल्या गुड न्युजनंतर तिच्यावर कौतूकाचा वर्षाव सुरु झाला, तिचे हॉस्पिटल्समधील फोटोंवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या. आता तर आलिया-रणबीरच्या बाळाचे फोटो देखील काहींनी पोस्ट केले आहेत. त्यावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे. यासगळ्यात आणखी एका अभिनेत्रीची गुड न्युज समोर आली आहे.आलियानं मुलीला जन्म देताच बऱ्याच बॉलीवूड सेलिब्रेटींनी देखील तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. आलियानं देखील पुढील सहा महिने आपण कोणत्याही प्रोजेक्टवर काम करणार नसल्याचे म्हटले आहे. केवळ विश्रांती घेणार असून, आपल्यासाठी व बाळासाठी ती जास्त महत्वाची असल्याचे सांगितले आहे. आलियाच्या गोड बातमीचा प्रभाव कायम असतानाच आणखी एका अभिनेत्रीची गुड न्युज व्हायरल झाली आहे, टीव्ही अभिनेत्री रुचा हसबनीसनं मुलगा झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.साथ निभाना साथिया फेम अभिनेत्री रुचाचा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची मोठी पसंतीही मिळवली आहे.तिच्या गोड बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. साथ निभाना साथियामध्ये या अभिनेत्रीनं राशीची भूमिका केली होती. ती लोकप्रियही झाली होती. रुचाही दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिनं पोस्ट शेयर करुन चाहत्यांना आपल्या गोड बातमीविषयी सांगितलं आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

रुचानं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करताना बेबी बॉयच्या पायाचे फोटो दाखवले आहेत. याचबरोबर त्या फोटोंमध्ये बेबी बॉय हा झोपलेला दिसतो आहे. तू एक मोठी जादू आहे, असे रुचानं त्या फोटोंविषयी लिहिलं आहे. रुचाच्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलं आहे. तिला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत शुभेच्छाही दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने