“स्वतःची मुलगी सांभाळता येत नाही…” सुंबुलच्या वडिलांवर टीना दत्ता भडकली

मुंबई : बिग बॉस १६ मध्ये सध्या टीना दत्ता, सुंबुल तौकीर खान आणि शालीन भानोत यांच्या ट्रँगलमुळे हाय वोल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अनेकदा सुंबुलला शालीनला आवडतो आणि ती त्याच्या प्रेमात आहे असा दावा करण्यात आला आहे. तर कधी शालीन आणि टीना दत्ता यांच्यात काहीतरी चालू असल्याचं बोललं गेलं. या तिघांमधील कनेक्शनमुळे बिग बॉसमध्ये बराच वाद झाला. त्यानंतर सुंबुल आणि तिच्या वडिलांचं एकमेकांशी फोनकॉलवर बोलणं करून देण्यात आलं आणि बिग बॉसने याची माहिती घरातील सदस्यांनाही दिली. ज्यानंतर घरात पुन्हा मोठा वाद झाला.जेव्हा सुंबुल तौकीर तिच्या वडिलांशी बोलत होती तेव्हा त्यांनी टीना आणि शालीन यांच्याबद्दल असं काही बोललं जे ऐकल्यानंतर शालीन आणि टीना दोघांनाही राग अनावर झाला. सुंबुलच्या वडिलांनी टीना आणि शालीनबाबत बोलताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. एवढंच नाही तर सुंबुललाही या दोघांपासून दूर राहण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. पण एवढं सगळं झाल्यानंतर सुंबुल पुन्हा एकदा शालीन आणि टीना यांच्याबरोबर दिसली ज्यामुळे शालीन तिच्यावर खूप चिडला.सुंबुलच्या वडिलांचं सगळं बोलणं ऐकून घेतल्यानंतर शालीन सोफ्यावरून उठतो आणि सुंबुलवर जोरात ओरडतो. “तुझे बाबा एवढं सांगत आहेत तर तू आमच्यापासून दूर राहा ना. का बोलतेस आमच्याशी. तुझं डोकं फिरलं आहे का?” एवढं बोलून शालीन टेबलवर जोरात लाथ मारतो. त्यानंतर शालीनच्या पाठोपाठ टीनाही सुबुंलवर भडकते. ती म्हणते, “या सगळ्याशी माझं काहीच देणं घेणं नाही. तुझे बाबा आमच्यावर अशाप्रकारचे आरोप कसे काय करू शकतात? माझे बाबा नाही आहेत का? मी पण कुणाची मुलगी आहे. पण माझं वागणं बाहेर चुकीचं दिसत नाहीये.”टीना पुढे म्हणते, “स्वतःच्या मुलीची इज्जत वाचवण्यासाठी ते माझ्या चारित्र्यावर बोट ठेवत आहेत. जर स्वतःच्या मुलीला सांभाळता येत नसेल तर दुसऱ्यांच्या मुलीकडे अजिबात बोट दाखवू नका.” या सगळ्या हाय वोल्टेज ड्रामानंतर बिग बॉसच्या सेटवर सुंबुलचे वडील आणि टीना दत्ताची आई एकमेकांसमोर येतात. त्यामुळे आता आगामी एपिसोड आणखी रंजक होणार असल्याची चिन्ह आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने