गोविंदानं मुलासोबत पहिल्यांदाच केला डान्स, यशवर्धनला पाहून लोक म्हणाले,'अरे हा तर...'

मुंबई : बॉलीवूडमध्ये नंबर १ हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाने आपला मुलगा यशवर्धन आहूजासोबत पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर जबरदस्त डान्स केला. त्याचं झालं असं की, गोविंदा आपली पत्नी सुनिता आहूजासोबत 'इंडियन आयडल १३' च्या मंचावर पोहोचला होता,जिथे खूप मजेदार किस्से शेअर करत धमाल करतानाच गोविंदाचा तुफान परफॉर्मन्स देखील झाला. यावेळी समोर धर्मेन्द्र देखील बसले होते. गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धनला एकत्र डान्स करताना पाहून धर्मेंद्र यांना देखील डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहूजा इंडियन आयडल १३ मध्ये पोहोचले होते, त्यावेळी दोघांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप गोष्टी शेअर केल्या. सुनिता आहुजा यांनी आपल्या प्रेग्नेंसीच्या वेळचा मजेदार किस्सा त्यावेळी ऐकवला. आता या कार्यक्रमातील एका व्हिडीओची चर्चा सर्वत्र होताना दिसते आहे,पण तो व्हिडीओ आहे गोविंदा आणि यशवर्धनचा डान्स व्हिडीओ.

गोविंदा आणि यशवर्धनचं इंडियन आयडलच्या मंचावर स्वागत केलं गेलं ते होस्ट आदित्य नारायणकडून. त्यानंतर आदित्य त्याला म्हणाला,'यश,असं तर आम्ही तुला जाऊ देणार नाही,एक तरी परफॉर्मन्स झालाच पाहिजे'. यानंतर गोविंदा देखील आपल्या मुलासोबत डान्स करायला स्टेजवर दाखल झाला. त्यावेळी गोविंदाची पत्नी सुनिता कमेंट करत म्हणाली,'बाप आणि मुलाचा परफॉर्मन्स'. गोविंदानं आपल्या 'कुली नं '1 सिनेमातील गाण्यावर धमाकेदार डान्स केला. 'गोरिया चुरा न मेरा जिया' या गाण्यावर बाप-लेकानं ठेका धरला.'इंडियन आयडल १३' च्या मंचावर गोविंदा आणि यशवर्धनला एकत्र डान्स करताना पाहून तिथे उपस्थित धर्मेंद्र यांना देखील डान्स करण्याचा मोह आवरला नाही. या शो चे परिक्षक विशाल ददलानी, हिमेश रेशमिया आणि नेहा कक्कड आहेत.यशवर्धन आहूजानं लंडनमधील मेट फिल्म स्कूलमधनं अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्याच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्यानं साजिद नाडियादवालाला असिस्ट केलं आहे. याच कामानं त्यानं इडस्ट्रीत आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला आहे. यशवर्धनने साजिदसोबत 'ढिशुम', 'किक २','तडप' सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे. यशवर्धन त्या स्टार किड्सपैकी एक आहे जो लाइमलाइटपासून दूर राहणं अधिक पसंत करतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने