Yes Bank घोटाळ्याप्रकरणी राणा कपूर यांना जामीन मंजूर; ED नं केली होती अटक

दिल्ली  : Yes बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. कपूर यांना ईडीनं 466.51 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.येस बँकेच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची ईडी (ED) चौकशी करत आहे. माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून आपल्या कुटुंबाची बाजू घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयनं मार्च 2020 मध्ये फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा गुन्हा दाखल केला होता. या आधारावर ईडीनं त्यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही दाखल केला आहे.फसवणूक प्रकरणी सीबीआयनं सप्टेंबरमध्ये कपूर आणि अवंथा ग्रुपचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं होतं. दरम्यान, गेल्या वर्षी 2 जून रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कपूर यांचं नाव संशयित म्हणून आढळलं नव्हतं. यानंतर घोटाळ्याच्या तपासात त्यांचं नाव पुढं आलंय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने