पालकमंत्री म्हणून पुन्हा बसणारच; अजित दादांचं सूचक विधान

मुंबई - मागील काही महिन्यात राज्यात घडलेल्या घटनांमुळे कोण कोणासोबत सरकार स्थापन करेल याचा काही नेम राहिला नाही. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार घेऊन बंड केल्यानंतर काहीही होऊ शकतं, असं चित्र तयार झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळी ६ वाजता भाजपसोबत जावून घेतलेला शपथविधी सर्वांनाच ठावूक आहे. त्यातच अजित पवार यांनी आज, सूचक विधान केलं आहे.मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याचे वृत्त येत आहे. 




तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील मंथन शिबीरानंतर अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही झाल्या होत्या. त्यातच आज अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत विधान करून लक्ष वेधलं आहे.तुम्ही पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील बैठकीला येत नव्हते. आता ते पालकमंत्री असताना तुम्ही बैठकीला येतात, अस विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, जेव्हा लोक सांगतील की, आता विरोधी पक्षात आमदार म्हणून काम करा, त्यावेळी करायचं. ज्यावेळी सत्ताधारी पक्षाचा मंत्री आणि आमदार म्हणून काम करायच असेल तेव्हा आपण पालकमंत्री म्हणून पुन्हा बसणारच आहोत, असं अजित पवार म्हणाले.अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री होते. मात्र आता सरकार बदललं असून भाजपनेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली असून पुण्याचे कारभारी आता चंद्रकांत पाटील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने