पवारांवर नक्की कसले उपचार सुरू आहेत? डॉक्टरांनीच सांगितलं...

शिर्डी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, आजच ते शिर्डीतल्या कार्यकर्ता शिबिरासाठी रवाना झाले आहेत. तिकडून येऊन पुन्हा ते रुग्णालयात दाखल होतील. त्यांना काय झालंय हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे.शरद पवार आज शिर्डीला कार्यकर्ता शिबिरासाठी हेलिकॉप्टरने रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमही होती. ही डॉक्टरांची टीम त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून राहतील.शरद पवार यांच्यासोबत डॉक्टर प्रतीक समदानी आणि त्यांचे काही सहकारी आहेत. शिर्डीहून परतल्यावर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल केलं जाणार आहे.

शरद पवार यांच्या तब्येतीबद्दल त्यांच्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले, "शरद पवार पु्न्हा रुग्णालयात दाखल होतील. दोन तीन तास ते कसे राहतायत, तब्येत कशी राहतेय, त्यावर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. त्यांच्यावर न्यूमोनियासाठी उपचार सुरू आहेत. त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. " तर पवार साहेब सध्या प्रकृती आणि राजकीय लढा देत आहेत. त्यांना थोडा ताप आला आहे, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने