अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्या प्रकरणी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

कोल्हापुर:  अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्या प्रकरणी कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाले आहेत. आज या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लवचिक प्रकरणातून १४ वर्षे मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर हिंदू जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामध्ये आमदार नितेश राणे काही काळात सहभागी झाले आहेत .अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यामागे लव्ह जिहाद प्रकरण असल्याचा आरोप केला जात आहे.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याच्या घटनेला दोन आठवडे उलटले असले तरी तिचा अद्याप शोध लागलेला नाही. याबाबत वेगाने तपास करण्याची विनंती कुटुंबियांनी केली आहे. मुलीचे नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांना दोन दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन दिले आहे. आम्हाला न्याय द्या, अन्यथा राज्यभरात सर्वत्र आंदोलन करू, असा इशाराही मुलीच्या नातेवाईकांनी दिला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटना आज कोल्हापुरात जन आक्रोश आंदोलन सुरू केले आहे. आमदार नितेश राणे,भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, बंडा साळुंखे, महेश उरसल यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते, तरुण, युवक , महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.आमच्या भगिनींना न्याय द्या, पाकिस्तान मर्दाबाद अशा घोषणा दिल्या जात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने