'फुटबॉल' हे नाव एका राजाला सुचलं होतं, जाणून घ्या लाडक्या फिफाचा इतिहास

कतार: सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. फुटबॉल जगातील सर्वात लोकप्रिय खेळांपैकी एक आहे. त्यामुळे जगातील सर्वात लोकप्रिय खेळाचा वर्ल्ड कप असल्याने चर्चा तर होणारच. फुटबॉलच्या ९० मिनिटांच्या सामान्यातील प्रत्येक सेकंद खेळाडूंसाठी महत्त्वाचा असतोच, सोबतच आपल्या आवडत्या संघाने जिंकावे यासाठी चाहते देखील देव पाण्यात घालून बसलेले असतात. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अनेक उलटफेर देखील पाहायला मिळत आहे. या उलटफेरप्रमाणेच सर्वात लोकप्रिय खेळाचा इतिहास देखील तसाच रंजक आहे.खूपच जुना आहे फुटबॉल खेळ

फुटबॉल या शब्दातच खेळाचा अर्थ स्पष्ट होतो. पायाने बॉलला ढकलत गोल करायचा असतो, त्यामुळे या खेळाला फुटबॉल असे नाव पडले. याच्या इतिहासाबाबत अनेक वेगवेगळी मतं देखील आहेत. फिफानुसार, फुटबॉल हा चीनी खेळ सुजूचे विकसित स्वरुप आहे. हा खेळ ह्याँ वंशाच्या काळात विकसित झाला होता. याव्यतिरिक्त जापानच्या असुका वंशांच्या शासन काळात खेळल्या जाणाऱ्या ‘केमरी’ या खेळाचे देखील हे विकसित रूप असल्याचे मानले जाते.वर्ष १४०९ मध्ये हा खेळ ब्रिटनमध्ये देखील पोहचला. त्यावेळी राजकुमार हेनरी फोर्थने फुटबॉल असे नाव दिले. ब्रिटनमध्ये हा खेळ लोकांना एवढा आवडला की, राजा हेनरीने वर्ष १५२६ मध्ये या खेळासाठी स्पशेल बुट देखील बनवले. जेणेकरून, खेळाडूंना सहज फुटबॉल खेळता येईल. रिपोर्टनुसार, वर्ष १५८६ मध्ये जॉन डेव्हिस नावाच्या एका समुद्री जहाजाच्या कॅप्टनने ग्रीन लँड येथे आपल्या सहकाऱ्यांसोबत फुटबॉलचा सामना खेळला होता.

१६ व्या शतकात झाली स्पर्धांना सुरुवात

१६ व्या शतकाच्या अखेरीस व १७ व्या शतकाच्या सुरुवातीला फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले जाऊ लागले. यादरम्यान, दोन संघांमध्ये सामने खेळण्याची सुरुवात झाली आहे. याच काळात गोलचे देखील नियम बनवण्यात आले. त्यावेळी ८ ते १२ गोलचा एक सामना होत असे.२०व्या शतकात फुटबॉलची लोकप्रियता शिगेला पोहचली. यावेळी फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय संस्था असावी, असे समोर आले आहे. यासाठी इंग्लिश फुटबॉल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली फ्रान्स, डेनमार्क, स्पेन, नेदरलँड, स्वीडन, बेल्जियम आणि स्विर्झलँड सारख्या यूरोपियन देशांची बैठक देखील झाली.पुढे जाऊन २१ मे १९०४ ला फेडरेशन इंटरनॅशनल ऑफ फुटबॉल असोसिएशन अर्थात (FIFA) ची स्थापना झाली. याचे मुख्यालय स्विर्झलँडच्या ज्यूरिख येथे आहे. याच संस्थेंतर्गत आता वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने