‘बिग बॉस’च्या घरात तुफान राडा, अर्चना गौतमने गळा दाबल्यानंतर शिव ठाकरेच होतोय ट्रोल, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये शिव ठाकरे व अर्चना गौतम यांच्यामध्ये तुफान राडा झाला. साजिद खान व गौरी नागोरीचं भांडण सुरु असताना शिवने या वादात उडी घेतली. हे भांडण सुरु असताना शिवनंतर अर्चनानेही साजिद-गौरीच्या भांडणामध्ये भाग घेतला. या वादादरम्यान शिव अर्चनाच्या बराच जवळ आला. म्हणूनच अर्चनाने त्याचा चक्क गळा पकडला. पण या सगळ्या भांडणानंतर शिवला ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागत आहे.साजिदने भांडणामध्ये गोरी नागोरीला बरंच सुनावलं. तिच्या खासगी आयुष्याबाबत कमेंट केल्या. त्यानंतर साजिदला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. या वादामध्ये शिवचंही नाव घेतलं जात आहे.शिव महाराष्ट्राचं नाव खराब करत असल्याचंही काही जण बोलत आहेत. तसेच तो आता बरोबर खेळत नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. हा संपूर्ण आठवडाच ‘बिग बॉस’च्या घरातील वादग्रस्त आठवडा ठरला आहे.आता या वीकेण्ड का वारमध्ये सलमान या सगळ्या वादावर काय भाष्य करणार? कोणत्या स्पर्धकाची सर्वाधिक शाळा घेणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने