कतारच्या वर्ल्डकप तयारीत हजारो भारतीयांनी प्राण गमावलेत, वाचा डिटेल रिपोर्ट

कतार: फिफा वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. कतारकडे यजमानपद आहे. २९ दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी कतारमध्ये गेल्या १२ वर्षांपासून तयारी सुरू आहे. दरम्यान, एका रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेपाळ सह भारतातील हजारो जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.२९ दिवसांच्या विश्वचषक स्पर्धेसाठी कतारमध्ये गेल्या १२ वर्षांपासून तयारी सुरू आहे. ७ नवीन स्टेडियम, १०० हून अधिक हॉटेल्स, नवीन स्मार्ट सिटी, नवीन विमानतळ आणि नवीन मेट्रो लाईन बांधण्यात आली आहे. यादरम्यान सुमारे १७.९ लाख कोटी खर्च करण्यात आला. मात्र, हजारो कामगारांना आपला प्राण गमवावा लागला.



कतारच्या वाळूत भारतातील हजारो मजुरांचे रक्त

कतारने फिफा विश्वचषकाच्या तयारीसाठी ७० हजारांहून अधिक मजूर काम करत होते. या मजुरांना ४१ ते ४२ अंश तापमानात काम करावे लागत. 15 तास काम केले, तरीही योग्य पगार मिळाला नसल्याची माहिती समोर आली आहे. ऍम्नेस्टी इंटरनॅशनल रिपोर्ट २०२१ प्रकाशित होणार आहे. १० वर्षांनंतर १५,०२१ स्थलांतरित मजुरांच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. २०२१ मध्ये द गार्डियनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात कतारमध्ये २०१० पासून ६,५०० पेक्षा अधिक मजूरांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या कामगारांची संख्या

भारत- २,७११

नेपाळ- १६४१

बांग्लादेश- १,०१८

पाकिस्ताना ८२४

श्रीलंका- ५५७

मात्र, विश्वचषकाची तयारी करत असताना बांधकामाच्या ठिकाणी कामगारांचा मृत्यू झाल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केलेला नाही. कतार सरकारच्या म्हणण्यानुसार, २०१४ ते २०२० दरम्यान ३७ लोक कार्यरत साइटवर मरण पावले, ज्यामध्ये केवळ 3 मृत्यू कामाशी संबंधित होते.

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते, २०२१ मध्ये ५० स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला, १५०६ गंभीर जखमी झाले आणि ३७,६०१ किरकोळ जखमी झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने