नाकाद्वारे मिळणार कोरोनाची लस; भारत बायोटेकच्या 'वॅक्सिन'ला मंजुरी

 नवी दिल्लीः भारत बायोटेकची नाकावाटे मिळणाऱ्या 'फाईव्ह आर्म्स' कोविड बुस्टर वॅक्सिनला मर्यादित वापराकरीता मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी औषध नियंत्रण विभागाने या वॅक्सिनला परवानगी दिली आहे.महत्त्वाचं म्हणजे भारत बायोटेकचा हा बुस्टर डोस नाकाद्वारे दिला जाणार आहे. हा डोस इतर वॅक्सिनपेक्षा जास्त प्रभावशाली असल्याचं भारत बायोटेकचं म्हणणं आहे. 
शिवाय सोप्या पद्धतीने वापरण्यात येणार असल्याने घरीदेखील घेता येईल.सुईशी संबंधित कुठलाच धोका या वॅक्सिनमुळे होणार नाहीये. सुईमुळे होणाऱ्या वेदनाही टाळता येणार आहेत. त्यामुळे या लशीला जास्त प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही.सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हायरसने शरीरात प्रवेश करण्यापूर्वीच त्याला मारण्याची क्षमता या लशीमध्ये आहे. शरीराच्या इतर भागांना होणारी हानी या वॅक्सिनमुळे होणार नाहीये. भारताच्या सर्वात प्रभावी लशीला मंजुरी मिळाल्याने एक मोठी उपलब्धी समजली जातेय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने