इराणमध्ये हल्लेखोरांकडून बेछुट गोळीबार, 5 ठार तर 10 जखमी

इराण: इराणमधून पुन्हा मोठी बातमी समोर आली आहे. इराणमधील सेंट्रल मार्केटमध्ये बंदूकधारी हल्लेखोरांनी बेछुट गोळीबार केला आहे. या गोळीबारामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये 10 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. इराणच्या IRNA वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम इराणमधील इजेह शहरामध्ये बेछुट गोळीबाराची घटना घडली आहे. इजेह शहरातील मार्केटमध्ये हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आहे. हल्लेखोर दोन मोटरसायकलवरून एजेह शहराच्या सेंट्रल मार्केटमध्ये पोहोचले दरम्यान तिथल्या लोकांवर आणि सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, ज्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मात्र, आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने