'आप'कडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर; केजरीवालांची घोषणा

गुजरात : गुजरातमध्ये ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. गढवी हे पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत.ईशुदान गढवी हे एक लोकप्रिय टीव्ही पत्रकार होते. मागील वर्षी राजकारणात प्रवेश करण्यासाठी त्यांनी पत्रकारिता सोडली. त्यानंतर गुजरातमधील 'आप'चा सर्वात प्रमुख चेहरा म्हणून ते पुढे आले. आता पक्षाने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. २०१७मध्ये काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. मात्र यावेळी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. कारण पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे भाजप-काँगेस-आप अशी तिरंगी लढत गुजरामध्ये होईल, असं चित्र आहे.

कुठल्या विभागात किती मतदारसंघ?

मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

२०१७मध्ये अशी झाली टक्कर

गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने