केसांच्या मूळांना तेल लावणे चुकीचेच; जावेद हबीबचा सल्ला

मुंबईः तिचे केस किती चांगले आहेत, त्याचे केस किती दाट आहेत, ही अशी वाक्य सर्रास आपल्या कानावर पडत असतात. त्यावरून आपण आपल्या केसांची वाढ नक्की कशी होतेय यावर विचार करतो. आता त्यांनी त्यासाठी काय मेहनत घेतली आणि तुम्हाला तुमच्या केसांसाठी काय करणं गरजेच आहे हे एकदा बघुयात.केसांची काळजी घेण्यासाठी मोठे सलोन किंवा महागड्या हेअर एक्सपर्टचा सल्ला घेण्याची गरज आहे, असं प्रत्येकाला वाटतं. पण थांबा, तस नाहीय. आपल्याला सल्ले देणारे एक्सपर्ट फेमस नक्कीच आहेत पण त्यांनी दिलेला सल्ला अगदीच घरात करता येईल असाच आहे.

प्रसिद्ध हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मते, केसांच्या वाढीसाठी योग्य त्या प्रमाणात पोषण द्यावे लागते. तुमच्या किचनमध्ये असलेल्या दोन वस्तू घेऊन तुम्ही केसांची योग्य ती काळजी घेऊ शकता. ‘कांदा’ आणि ‘आले’ या दोन वस्तू आपल्याला यासाठी लागणार आहेत. यासाठी कांदा आणि आले यांचा रस समप्रमाणात घेणे गरजेचे आहे.हा रस तुम्हाला आठवड्यातून एकवेळा केसांच्या मुळाशी लावायचा आहे. तुम्हाला फक्त हे मिश्रण तुमच्या केसांमध्ये फक्त १० मिनिटे ठेवावे लागेल. यानंतर तुम्हाला केस कोमट पाण्याने धुवून टाकावे लागतील.आजकाल लवकर केसांची वाढ होण्यासाठी बाजारात अनेक आयुर्वेदिक तेल आणि शाम्पू उपलब्ध आहेत. पण, जोपर्यंत तुम्ही त्याचा उपयोग करता तोवर ते केसांना लाभदायक ठरतं. पण, नंतर त्याचे दुष्परिणामही दिसून येतात.एका मुलाखतीत जावेद हबीब यांनी असाही सल्ला दिला की, अनेक लोक रात्री केसांना तेलाने मसाज करून झोपी जातात आणि सकाळी केस धुतात.हि पद्धत देखील चूक आहे. रात्रीचे तेल न लावता अंघोळ करताना केसांना शॅम्पू लावण्याच्या ५ मिनिटे आधी तेल लावा आणि मग लगेच केस धुवून टाका.जावेद सांगतात की, तुमच्या केसांना तेल लावताना केसांच्या मुळांना तेल लावू नये. असे केल्याने तुम्ही तुमच्या केसांमध्ये कोंडा वाढू शकतो. ही आश्चर्यचकीत करणारी गोष्ट आहे. कारण आपण लहानपणापासून हे याच पद्धतीने तेल लावत आलो आहोत. आपल्या वडिलधाऱ्यांकडूनही केसांना तेल लावण्याची हीच पद्धत शिकलो आहोत. पण हे चुकीचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने