जय दुधाणेने ‘या’ स्पर्धकावर केली कॉमेंट; म्हणाला, “याने मागचा सीजन…”

मुंबई : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. हिंदीनंतर आता मराठीत बिग बॉस सुरु झाल्याने हा कार्यक्रम साहजिकच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. सध्या या कार्यक्रमाचे चौथे पर्व सुरु आहे. नुकतीच या पर्वातून रुचिरा जाधव बाहेर पडली आहे. या कार्यक्रमावर अनेकजण टिपणी करत असतात. मागच्या पर्वातील चर्चेत राहिलेला मॉडेल जय दुधाणेने बिग बॉसच्या एका स्पर्धकावर कॉमेंट केली आहे.बिग बॉस मराठी ४ चे स्पर्धक आणि त्यांचा परफॉर्मन्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक माजी स्पर्धक सीझन आणि स्पर्धकांच्या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर त्यांची मते शेअर करत आहेत. एमटीव्ही वरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम ‘स्प्लिट्सविला’च्या माध्यमातून लाखो तरुणींच्या मनावर राज्य करणारा जय दुधाणे आता पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने सध्याच्या पर्वातील अक्षय केळकरवर कॉमेंट केली आहे.मराठी टीव्ही, व्हिडिओ, मालिकांमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून त्याची ओळख आहे. नुकताच तो एका भागात त्याच्या प्रेयसीबद्दल भावूक झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने