तो मार असा बसेल की.. जितेंद्र जोशीच्या त्या वाक्याने हादरले सदस्य

मुंबई :'बिग बॉस मराठी'चे चौथे पर्व चांगलेच रंगत आहे. गेले काही दिवस घरात कॅप्टनसी टास्कची लगबग सुरू होती. कालच्या भागात बिग बॉसच्या घरात 'वॅलेनटाईन डे' साजरी झाला. या निमित्ताने स्पर्धकांना एक भन्नाट कॅप्टनसी टास्क खेळावा लागला. त्यांना कॅप्टनसी साठी 'टेडीबेअर' बनवण्याचा टास्क देण्यात आला होता. यावेळी अत्यंत उत्तम खेळी करून डॉ. रोहित शिंदे पुन्हा एकदा घराचा कॅप्टन झाला. पण आज घरात वेगळेच कार्य रंगणार आहे, आणि त्यासाठी एक खास पाहुणा बिग बॉस च्या घरात आला आहे.

बिग बॉसच्या घरात आज सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी येणार आहे. सध्या तो त्याच्या 'गोदावरी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वत्र फिरत आहे. याच निमित्ताने तो बिग बॉस च्या घरात आला होता, यावेळी त्याने स्पर्धकांची चांगलीच बोलती बंद केली.जितेंद्रचे जय्यत स्वागत झाल्यानंतर तो स्पर्धकांना एक टास्क देतो. या टास्कचे नाव "टारगेट टास्क" असून या खेळात एका स्पर्धकाचे हात बांधले जाणार असून दुसऱ्या स्पर्धकाने त्याला पाण्याने भरलेले फुगे फेकून मारायचे आहेत. हा टास्क डेंजर असला तरी सगळे स्पर्धक तो एन्जॉय करताना दिसत आहेत. पण तेव्हाच अमृता धोंगडे बोलते सर तुम्ही पण एक फुगा मारून पहा.. त्यावेर जितेंद्र जोशी स्पर्धकांना म्हणतो, 'हे तर काहीच नाही. मी यापुढे जे करणारे ते यापेक्षा डेंजर असेल. तो मार असा बसेल की...' ही ऐकून स्पर्धक गप्प होतात.

या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. आता अभिनेते जितेंद्र जोशी स्पर्धकांना नक्की कोणता टास्क देणार, तो कशासाठी असेल, कोणता स्पर्धक तो टास्क जिंकेल हे पाहणं रंजक ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने