भारत जोडो यात्रेत होणार शरद पवार करणार एन्ट्री?

नांदेड : हजारो मशाल हाती घेऊन राहुल गांधी यांच्यासह भारतयात्री सोमवारी रात्री तेलंगणातून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश केला. या यात्रेत आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह सर्वेसर्वा शरद पवार सहभागी होतीत अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे राहुन गांधी यांच्या या यात्रेला नवं वळण लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.या बड्या नेत्यांसह शरद पवादेखील सहभागी होतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 'शरद पवार यांच्या वेळापत्रकात काहीसा बदल झाला आहे. मला कळले आहे की ते 10 नोव्हेंबर रोजी यात्रेत सहभागी होणार आहेत, परंतु सर्व काही त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून आहे.' अशी माहिती नांदेडचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पत्रकारांना दिली आहे.कालच शरद पवार यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात तीन दिवस उपचार घेतल्यानंतर शरद पवार यांना डिस्चार दिला जाणार होता. परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा झाल्याने त्यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला होता. अखेर आठ दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सोमवारी (7 नोव्हेंबर) महाराष्ट्रात पोहोचली आहे. दोन महिन्यांपूर्वी कन्याकुमारी येथून सुरू झालेला हा प्रवास कर्नाटकातून तेलंगणा आणि आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. सोमवारी रात्री नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेने प्रवेश केला. हजारो मशाली घेऊन राहुल गांधी यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलूरमध्ये दाखल झाले. तेलंगणातून महाराष्ट्रात दाखल होताच तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रेवंत रेड्डी यांनी नाना पटोले यांच्याकडे तिरंगा ध्वज सुपूर्द केला. यावेळी राहुल गांधी यांचे मराठा स्टाईलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने