जितेंद्र आव्हाडांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबईः ठाण्यातल्या विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना चांगलीत भोवली आहे. आव्हाडांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक केल्यापासून म्हणजे काल दुपारपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातल्या पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे.जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता आव्हाडांकडून जामिनासाठी अर्जही दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने