Hera Pheri 3 मध्ये कार्तिक आर्यनची एन्ट्री, अक्षयसोबत स्क्रीन शेअर करणार की केलं रीप्लेस? जाणून घ्या

मुंबई : अक्षय कुमार आणि त्याचा गाजलेला 'हेरा फेरी' सिनेमा चाहत्यांच्या खूप जवळचा आहे. याच्या दोन्ही भागांना लोकांनी डोक्यावर उचलून धरलं. गेल्या काही दिवसांपासून 'हेरा फेरी 3' विषयी देखील चर्चा रंगल्या आहेत. चाहते मोठ्या उत्सुकतेने याची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी होती की अक्षय कुमार आपल्या 'आवारा पागल दिवाना', 'वेलकम' आणि 'हेरा फेरी' सिनेमांवर लवकरच काम सुरु करणार आहे. त्यानं मेकर्सशी यासंदर्भात मीटिंगही केल्याचं समोर आलं होतं.यादरम्यान आता 'हेराफेरी 3' संबंधित एक मोठी बातमी कळतेय की यात कार्तिक आर्यनची वर्णी लागली आहे. परेश रावल यांनी या बातमीला कन्फर्म केलं आहे. ही मोठी बातमी कळल्यावर आता सोशल मीडियावर #Herapheri3 ट्रेंड होताना दिसत आहे.परेश रावल यांनी ट्वीटरवर एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देत काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांना चाहत्यानं विचारलं होतं की, 'परेश रावल सर,हे खरं आहे का की कार्तिक आर्यन 'हेरा फेरी 3' मध्ये काम करत आहे?' त्यावर परेश रावल म्हणाले,'हो,हे खरं आहे'. आता कार्तिकनं अक्षयला रीप्लेस केलं की तो अक्षयसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार हे मात्र अद्याप कन्फर्म झालेलं नाही.

ही बातमी समोर आल्यानंतर अक्षय कुमारचे चाहते मात्र चिंतेत पडलेयत आणि चांगलेच भडकलेयत देखील. ते म्हणतायत,अक्षयशिवाय हेरा फेरी 3 मध्ये दमच नसणार. ट्वीटरवर यासंबंधित ट्वीट व्हायरल होताना दिसत आहेत. तर मीम्सही व्हायरल होत आहेत.माहितीसाठी थोडं सांगतो की,कार्तिक आर्यनं 'भूल भूलैय्या 2' मध्ये अक्षय कुमारची जागा पटकावली होती. अक्षयचा 'भूल भूलैय्या' सुपरहिट सिनेमा होता. त्याचा अभिनय,संवाद सगळंच चाहत्यांना खूप आवडलं होतं, पण याच्या दुसऱ्या भागात मात्र कार्तिकला मुख्य भूमिका साकारण्यासाठी कास्ट केलं होतं.आता 'हेरा फेरी' संदर्भात बोलायचं झालं तर या सिनेमाचा दिग्दर्शक प्रियदर्शन होता. तर याचा दुसरा भाग दिग्दर्शक नीरज वोराने दिग्दर्शित केला होता. पण बोललं जात आहे की तिसरा भाग प्रियदर्शनच दिग्दर्शित करणार आहे. तर फिरोज नाडियादवाला सिनेमाची निर्मिती करतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने