काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचं KGF-2 कनेक्शन; राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल

बंगळुरू : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा  एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. KGF-2 या सुपरहिट चित्रपटातील गाण्यांचा या व्हिडिओमध्ये वापर करण्यात आला आहे. याबाबत आता KGF-2 ची गाणी बनवणाऱ्या म्युझिक कंपनीनं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतरांवर गुन्हा दाखल केलाय.बंगळुरूस्थित एमआरटी म्युझिकनं काँग्रेस नेते राहुल गांधी  सुप्रिया श्रीनाटे आणि जयराम रमेश यांच्याविरोधात कॉपीराइट उल्लंघनाचा गुन्हा दाखल केलाय. म्युझिक कंपनीनं आपल्या तक्रारीत म्हटलंय, 'सुपरहिट चित्रपट KGF-2 च्या गाण्यांचं कॉपीराइट त्यांच्याकडं आहे. कंपनीनं सर्व भाषांमधील गाण्यांच्या कॉपीराइटसाठी मोठी रक्कम गुंतवलीय. त्यामुळं कोणीही त्याचा वापर करू शकत नाही.'एमआरटी म्युझिकच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसनं परवानगीशिवाय चित्रपटातील गाणी घेतली आहेत आणि त्याचा वापर राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं मार्केटिंग व्हिडिओ बनवण्यासाठी केला आहे. एमआरटी म्युझिक कंपनीनं  राहुल गांधी, सुप्रिया श्रीनाटे आणि जयराम रमेश यांच्यासह काँग्रेसच्या तीन नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कंपनीनं त्यांच्यावर कलम 403 (मालमत्तेचा अप्रामाणिकपणे गैरवापर), 465 (बनावटीची शिक्षा), 120 (कारावासाची शिक्षा) कलम 34 (सामान्य हेतू) असे आरोप लावलेत आणि कॉपीराइट कायदा 1957 च्या कलम 63 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

कंपनीचे वकील काय म्हणाले?

एमआरटी म्युझिक कंपनीचे प्रतिनिधित्व करणारे वकील नरसिंहन संपत म्हणाले, 'एमआरटी म्युझिकच्या मालकीच्या कॉपीराइटचं उल्लंघन केल्याबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, सुप्रिया श्रीनाटे आणि राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने