मालदीवमध्ये लागलेल्या भीषण आगीत नऊ भारतीयांचा होरपळून मृत्यू

मालदीव : मालदीवची राजधानी माले येथे गुरुवारी परदेशी कामगारांच्या घरांना लागलेल्या आगीत किमान नऊ भारतीयांसह 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती एएफपी वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिली आहे.अधिका-यांनी सांगितले की, ज्या इमारतीला आग लागली होती. तेथून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, यातील नऊ जण हे भारतीय तर एख जण बांग्लादेश येथील आहे. मालदीवच्या राजकीय पक्षांनी परदेशी कामगारांच्या अटींवर टीका केली आहे. या घटनेनंतर मालदीव येथील भारतीय दुतावासाने माले येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबाबत दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही मालदीव येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी +९६०७३६१४५२ आणि +९६०७७९०७०१ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने