बिनकामाचे लोकं सांगणार आपल्याला.. किरण मानेने अमृताला डिवचलं..

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरात किरण मानेचा पराभव करून रोहित शिंदे नुकताच कॅप्टन झाला. सध्या घरातील वातावरण एकदम गरम असून प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करत आहे. आज विकास आणि किरण यांची चर्चा होताना दिसणार आहे. तर दुसरीकडे अमृता देशमुख आणि किरण माने यांच्यात मोठा वाद होणार आहे.

विकास किरणला विचारताना दिसणार आहे, दादा एवढं काय ? इतका प्रॉब्लेम काय झाला आहे? त्यावर किरण मानेंचे म्हणणे आहे, ते बरोबर आहेत पण तू त्यांना समजून घ्यायला चुकला आहेस. आम्हांला त्याचा शॉक बसत नाही. तुला माहिती नाही एवढे वाईट आहेत ते... विकास आणि किरण नक्की कोणाबाबतीत बोलतं आहेत ? हे आजच्या भागात कळेलच.किरण माने अमृता धोंगडेशी बोलताना दिसणारे आहे. किरणचे म्हणणे आहे, अगं मी हिला म्हणजे अमृता देशमुखला सहज एक वाक्य बोलो, हिच्या बोलण्यात सूर आणि शब्द परफेक्ट असतात... त्यावर अमृता- देशमुख म्हणाली.. आणि इमोशन्स नसतात? त्यावर.. किरण म्हणाला, नसतातच कारण... मग हि चिडली, रडली.मग मानेने RJ वर नेला की रेडिओवर भावनाच ऐकू येतात, पुढे म्हणाले माझं म्हणणं आहे रेडिओचा विषय काढलायं कोणी? तुझ्या नॉर्मल बोलण्यात भावना नसतात. कळत नाही तू त्याच्या बाजूने आहे की याच्या बाजूने आहे? त्यावर अमृता देशमुखचे म्हणणे आहे, अहो कारण माझं नाव.. आणि RJ म्हणून बोलणं यात फरक आहे. आणि बोलण्यात जर तुम्ही इमोशन्स नाही म्हणता तर कसं ना? इमोशन्स वैगरे प्रमाणपत्र यांना द्यायची गरज नाहीये...' त्यावर अमृता म्हणते तुम्ही खूपच आगाऊ आहात.. तर किरण म्हणतो, तुझा आगाऊपणा लय बघितला आहे, बिनकामाचे इथे बसलेले लोकं सांगणार आपल्याला... आता हा वाद किती वाढतोय ही आजच्या भागात कळेल..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने