सावध राहा! किरण मानेचा विकासला सल्ला की कानभरणी?

मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज किरण माने - विकास तर दुसरीकडे रोहित, अमृता देशमुख आणि अक्षय केळकर यांची चर्चा रंगताना दिसणार आहे. किरण माने पुन्हा एकदा विकासला इतर स्पर्धक कसे आहेत, ते जे बोलतात त्यापेक्षा ही खूप वेगळे आहेत, त्यांच्या भावना वेगळ्या आहेत असे सांगताना दिसणार आहे. हे सांगण्यामागे किरणचा नेमका काय उद्देश आहे, विकासला तो भडकवत तर नाही ना.. हे आज कळेलच..तर रोहित शिंदे, किरण मानेबद्दल बोलताना दिसणार आहे. तो म्हणतो, 'मला माहिती होतं किरण माने केस काढणार नाही. बच्चन साहेब आहेत ते असं कसं?' त्यावर अक्षयचे म्हणणे पडले, 'बाहेर जायची भीती असेल कशाला टक्कल करून बाहेर जावं.. असं पण असू शकतं... कारण तसं त्यांनी काहीच केलं नाहीये.' त्यावर अमृता म्हणाली, 'काही सांगता नाही येत. मला नाही वाटतं त्यांना वाटतं कि ते गेमच्या बाहेर जातील. मला वाटतं ते जानेवारीनंतर पण असतील या घरात', त्यांचे फॅन्स त्यांना इथेच ठेवतील.

दुसरीकडे, किरण माने विकासला सांगताना दिसणार आहेत, 'तुला कळलं ना आता तू टार्गेट आहेस ते. आता तू लय मोठं टार्गेट असणार आहेस. त्यामुळे सावध राहा. कोणी स्तुती जरी केली ना तर धन्यवाद मानून वटकायचं. तो आपल्या बाजूने असतोच असे नाही.' असे किरणने विकासला सांगितले आहे. आता याचे परिणाम काय होणार.. पुढे काय घडणार ही आजच्या भागात कळेल.बिग बॉस मराठीचा खेळ सुरू होऊन आता ४० दिवस उलटले आहेत. रोज घरात नवीन राडा, नवे वाद होत आहेत. आज घरात कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. यामध्ये विकास आणि अमृता धोंगडे यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. शिवाय किरण माने आणि विकास सावंत यांच्यात मध्यंतरी फूट पडली होती. पण आता पुन्हा ते एकत्र आल्याने काहीतरी घडणार ही नक्की..

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने