“अब्रूची लक्तरं टांगली गेली, पण…” किरण माने यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबईः यंदा बिग बॉसचे चौथे पर्व विविध कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. हे पर्व सुरु झाल्यापासून त्यात दिवसेंदिवस येणारे ट्विस्ट, स्पर्धकांचे मतभेद, कामांवरुन होणारे वाद आणि त्यांचा खेळ यावरुन बिग बॉसचे चौथे पर्व गाजताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात असलेले अभिनेते किरण माने हे चांगलेच चर्चेत आहेत. ते फेसबुकवर कायमच सक्रीय असल्याचे पाहायला मिळतात. या आठवड्याचा कॅप्टन म्हणून रोहित शिंदेची वर्णी लागली आहे. त्यानंतर किरण मानेंनी एक पोस्ट शेअर केली.किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी बिग बॉसच्या कॅप्टन्सी टास्कदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. त्याबरोबर त्यांनी याला एक कॅप्शनही दिले आहे. त्यांनी त्याच्या साताऱ्याच्या स्टाइलमध्ये हे लिहिलं आहे. त्यामुळे ते चर्चेत आले आहे.दरम्यान बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवल्यापासून सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यामुळे बिग बॉसचा कार्यक्रम दिवसेंदिवस मजेशीर होताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने