लेकीच्या आगमनासाठी आलिया-रणबीरची जोरदार तयारी, रुग्णालयामधून घरी येताच कुटुंबियांसह नव्या बंगल्यामध्ये करणार गृहप्रवेश

मुंबई:  बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. आलियाने रविवारी (६ नोव्हेंबर) गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कपूर घराण्यातील राजकन्येच्या स्वागतासाठी आता कुटुंबियांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.लेकीच्या जन्मानंतर आलिया भट्ट आणि रणबीर कपूरसह कपूर कुटुंबीय त्यांच्या मुंबईतील ‘कृष्णराज’ या बंगल्यात गृहप्रवेश करणार आहेत. कपूर कुटुंबियांचा हा आलिशान बंगला आता आलिया-रणबीरच्या मुलीसाठी सज्ज झाला आहे. या बंगल्यात नुकतंच नुतनीकरण आणि इंटेरिअरचं काम करण्यात आलं आहे. कपूर कुटुंबियांच्या या आठ मजली बंगल्यात आलिया-रणबीरच्या मुलीसाठी खास एक मजला तयार करण्यात आला आहे.‘कृष्णराज’ बंगल्यातील पहिल्या मजल्यावर नीतू कपूर यांच्यासाठी रुम तयार करण्यात आली आहे. तर दुसऱ्या मजल्यावर आलिया-रणबीरची खास रुम असणार आहे. ‘कृष्णराज’ बंगल्यातील तिसरा मजला कपूर कुटुंबियातील राजकन्येसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. आलिया-रणबीरची मुलगी मोठी झाल्यावर तिच्यासाठी या मजल्यावर खास इंटेरिअर करण्यात येणार आहे. या बंगल्यातील चौथ्या मजल्यावर रणबीरची बहीण रिधीमा कपूर आणि तिची मुलगी यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.कपूर कुटुंबियांच्या या आलिशान बंगल्यात दिवगंत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा देणारी खास जागाही तयार करण्यात आली आहे. ‘कृष्णराज’मध्ये स्विमिंग पूल, आलिया-रणबीर आणि नीतू कपूर यांच्यासाठी ऑफिसही तयार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने