‘हॅरी पॉटर’मधील ‘सॉर्टिंग हॅट’ला आवाज देणाऱ्या लेस्ली फिलिप्स यांचे निधन

लंडन : हॅरी पॉटर’ चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचा आवाज अजरामर झाला असे ‘हॅरी पॉटर’च्या सॉरटिंग हॅटला आवाज देणारे ब्रिटिश कॉमिक अभिनेते लेस्ली फिलिप्स  यांचे निधन झाले आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 'कॅरी ऑन' या सीरिजमधील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. तर हॅरी पॉटरमधीलसॉर्टिंग हॅटला लेस्ली फिलिप्स यांनी आवाज दिला होता. लेस्ली फिलिप्स यांच्या निधनानं हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
लेस्ली फिलिप्स यांचा जन्म 20 एप्रिल 1924 रोजी लंडन येथे झाला. कॅरी ऑन सीरिजच्या यशानंतर, लेस्ली फिलिप्स यांनी 'डॉक्टर इन द हाऊस', टॉम्ब रेडर आणि मिडसमर मर्डर्स अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. लेस्ली फिलिप्स यांच्या आयकॉनिक वन लाइनर्सला प्रेक्षकांची पसंती मिळत होती. लेस्ली फिलिप्स यांनी 80 वर्षांपेक्षा जास्त काळ मनोरंजन क्षेत्रात काम केले असून 200 हून अधिक चित्रपट केले आहे.

हॉलीवुडसह 'हॅरी पॉटर'च्या संपूर्ण टीमसाठी हा मोठा धक्का आहे. कारण गेल्याच महिन्यात 'हॅरी पॉटर'मध्ये हॅग्रिडची  भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले होते. त्यांनंतर लगेचच लेस्ली फिलिप्स यांचे निधन झाल्याने त्यांच्यावर मोठा दुःखाचा प्रसंग ओढावला आहे. 'हॅरी पॉटर'च्या टीम कडून त्यांना सोशल मिडियावर श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने