“मच्छिंद्र कांबळींबरोबरच्या त्या नाटकामुळे माझी बायको…” ‘ठिपक्यांची रांगोळी’तील ‘कुक्की’ची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेत कुक्कीची भूमिका अभिनेता अतुल तोडणकर साकारत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत अतुल साकारत असलेली कूक्कीची ही भूमिकाही लोकप्रिय झाली आहे. अतुल हा विनोदी अभिनेता आहे. त्याबरोबर त्याने अनेक सिनेमा, नाटक यामध्ये गंभीर भूमिकाही ताकदीने केल्या आहेत. नुकतंच अतुल तोडणकरने एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मच्छिंद्र कांबळी यांची एक आठवण सांगितली आहे.अभिनेता अतुल तोडणकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमीच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत जुन्या आठवणी शेअर करताना दिसतो. नुकतंच अतुल तोडणकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने मच्छिंद्र कांबळी यांचे जुने फोटो पोस्ट केले आहेत. याला कॅप्शन देताना त्याने एक गोड आठवणही सांगितली आहे.दरम्यान अतुल तोडणकरची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. कधी कधी आयुष्यातील जुन्या आठवणी मनास आनंद देऊन जातात, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर अनेकांनी यावर हार्ट, स्मायली असे इमोजी पोस्ट करत कमेंट केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने