तरुणांचं भविष्य घडवण्यात राज्य पिछाडीवर! पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र नाहीच

मुंबई : जगाच्या पाठीवर शिक्षणाला विशेष महत्त्व आहे. शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो कोणीही त्याच्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. भारतीय शिक्षण व्यवस्थेबाबत बोलायला गेलं तर गेल्या दशकभरापासून शिक्षण व्यवस्थेत बरेच बदल दिसून आले आहेत.आज राष्ट्रीय शिक्षण दिवस आहे. या निमित्त्याने आज आपण भारतात कोणते राज्य शिक्षणात अव्वल आणि किती लोक साक्षर आहे, याविषयी जाणून घेणार आहोत.

भारतात किती लोक शिक्षित आहे?

आज टेक्नोलॉजी इतकी पुढे गेली आहे की है प्रत्येकजण आपआपल्या योग्यतेनुसार समाजात योगदान देतोय. यात समाज साक्षर करणे ही प्रत्येक राष्ट्राची महत्त्वाची भूमिका आहे. आपला भारत देश स्वातंत्र्य होताना फक्त 18 टक्के लोक साक्षर होते. भारतीय राष्ट्रीय सर्वेक्षणच्या रिपोर्ट नुसार वर्ष 2011 पर्यंत भारतातील साक्षरता दर 73% होता तर आता दहा वर्षानंतर 5 टक्के वाढत 2022 मध्ये हा साक्षरता दर 77.7% आहे.कोणते राज्य शिक्षणात अव्वल?

मागील वर्षी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने भारतातील शिक्षित लोकांचा आकडा जाहीर केला होता. या आकड्यानुसार भारतातील 28 राज्यांमध्ये केरलमध्ये सर्वात जास्त (96.2%) लोक शिक्षित आहे. तर सर्वात कमी साक्षर लोक हे आंध्रप्रदेशमध्ये आहे.केंद्र शासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीप सर्वात समोर आहे. 91.8% साक्षरता दर येथे आहे तर जम्मू -काश्मीरमध्ये सर्वात कमी साक्षरता दर 68.7% आहे. एवढंच काय तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत 86.2% लोकं साक्षर आहेत.

टॉप दहा साक्षर राज्ये

  • केरल (96.2%)

  • मिझोरम (91.58%)

  • दिल्ली (88.7%)

  • त्रिपुरा (87.75%)

  • उत्तराखंड (87.6%)

  • गोवा (87.4%)

  • हिमाचल प्रदेश (86.6%)

  • आसाम (85.9%)

  • महाराष्ट्र (84.8%)

  • पंजाब (83.7%)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने