"महाराष्ट्रात २ लाख कोटींच्या २२५ नव्या प्रकल्पांची तरतूद"

मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार रोजगार देण्याचा देशव्यापी कार्यक्रम सध्या राबवण्यात येणार आहे. हाच कार्यक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात येत असून त्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र देण्यात येत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात संवाद साधत तरुणांना तसंच राज्य सरकारला शुभेच्छा दिल्या.रोजगाराचा हा कार्यक्रम देशभऱात राबवण्यात येत आहे. महाराष्ट्रात या कार्यक्रमाला आज सुरुवात होत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच इतर नेतेही यावेळी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच रोजगार मिळणाऱ्या युवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "महाराष्ट्र सरकार राज्यातील युवकांना रोजगार देण्याचे काम करत आहे. गृह विभागात देखील भरती होत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. सरकारही विविध नोकऱ्यांसाठी मदत करत आहे. मुद्रा योजनेच्या माध्यमातूनही सरकार मदत करत आहे. महाराष्ट्राने याचा सर्वाधिक फायदा घेतला आहे. ग्रामीण भागात बचत गट सुरू केले आहेत, त्यातून महिलांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत आहे."

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "आज रोजगाराच्या विविध संधी केंद्र शासनातर्फे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महाराष्ट्रात २ लाख कोटी किंमतीचे २२५ प्रकल्पांची तरतूद करण्यात आली आहे. जग जसे बदलत आहे, तशा स्वरूपाच्या नव्या नोकऱ्या सरकार निर्माण करत आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे रोजगार व स्वयंरोजगाराची संधी मागास वर्गासह महिलांनाही मिळत आहे. गेल्या ८ वर्षात ८ कोटी महिला बचत गटाद्वारे जोडल्या गेल्या. इतर महिलांना रोजगार देण्याचे काम बचत गट करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात तरतूद केल्यामुळे लाखो रोजगार निर्माण होतात."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने