“माझं खरं रूप आता…” वय आणि बॉयफ्रेंडवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकाचं सडेतोड उत्तर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अशा कलाकारांपैकी आहे जी सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या ट्रोलिंगवर फारसं लक्ष न देता आपलं काम करत राहते. सोशल मीडियावर अनेकदा मलायकाचं प्रेमसंबंध, ड्रेसिंग, फॅशन, बोल्ड फोटोशूट यांची चर्चा होताना दिसते. अनेकदा तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. अशात आता मलायका नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्यातून ती ट्रोलर्सना उत्तरं देताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो मलायकाने नुकताच शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने, “आता तुम्हाला माझं खरं रुप दिसेल” असं म्हटलं आहे. मलायका अरोराच्या आगामी शोचा हा नवा प्रोमो समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाने तिला वारंवार ट्रोल केलं जाण्यावर भाष्य केलं आहे.



मलायका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर ट्रोल होत असते.या व्हिडीओमध्ये मलायका सांगते, “माझं ब्रेकअप असो किंवा मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर असेन, कधी मी कशी चालते यावरून तर कधी माझे कपडे कसे आहेत यावरून मला ट्रोल केलं जातं. ट्रोलर्स नेहमीच माझ्या मागे लागलेले असतात. पण आता मी तुम्हाला बोलण्यासाठी नवीन काहीतरी आणलं आहे. सर्वांना आता माझं खरं रुप दिसणार आहे.” या व्हिडीओला तिने जबरदस्त कॅप्शनही दिलं आहे.व्हिडीओ शेअर करताना मलायकाने लिहिलं, “जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या प्रत्येक कृतीची बातमी होत आहे, तर तुमच्यासाठी आणखी बरंच काही आहे. वय, लव्ह लाईफ, या सगळ्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. आता मी तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येत आहे. जिथे आपण सर्व गोष्टींबद्दल बोलू शकता.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने