लग्नाच्या दिड वर्षातच मानसी नाईक घेणार घटस्फोट? नवऱ्याचं आडनावही हटवलं

मुंबईः मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने अनेक हिट गाण्यांमुळे वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ ‘बाई वाड्यावर’ फेम मानसी सध्या चर्चेत आहे. या गाण्यांमुळे ती प्रकाश झोतात आली. मात्र यावेळी ती तिच्या फेमस गाण्यांमूळे नाही तर तिच्या खासगी आयूष्यामूळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. हे दोघ लवकरच वेगळं होणार असल्याच्या चर्चा रंगत आहे.

मानसीचा पती प्रदीप खरेरा हा एक बॉक्सर आणि मॉडेल आहे. बरीच वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी सप्तपदी घेण्याचा निर्णय घेतला होता. नेहमीच पतीसोबत फोटो शेअर करणारी मानसी गेल्या काही दिवसांपासून प्रदीपसोबतचे फोटो शेअर करत नाही आहे. त्याचबरोबर तिच्या नवऱ्यानेदेखील दोघांचे एकही फोटो शेअर केलेले नाही. त्यामूळे दोघांत काही बिनसलं आहे का अशा चर्चांना उधान आले आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वीच ‘वाईट बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही, चांगली बातमी- कोणतीही गोष्ट शेवटपर्यंत टिकत नाही’ अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर आता मानसी नाईकच्या विषयी चर्चा सुरु झाल्या.त्यातच त्यांचे सर्व रोमँटिक फोटो आणि फोटोशूट केलेल्या पोस्टही तिने डिलिट केल्या आहेत. इतकंच नाही तर तिनं तिच्या अकाउंटवरील नवऱ्याचं खरेरा हे आडनावही हटवलं आहे. त्यामूळे लग्नाच्या दिड वर्षातच दोघांच्या नात्यात दुरावा आला की काय त्याच्यातील प्रेमाचे नाते संपले असुन ही दोघं लवकरच विभक्त होणार असल्याच्या चर्चाना उधान आलं आहे. मात्र दोघांनीही याबाबत काही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामूळे या दोघांमध्ये सगळं काही ठिक असावं अशी आशा त्याचे चाहते करीत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने