''अरविंद केजरीवालांची हत्या होऊ शकते'' मनोज तिवारींच्या अटकेची मागणी

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं ते म्हणाले आहेत.मनिष सिसोदिया म्हणाले की, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची हत्या होऊ शकते. एमसीडी आणि गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप कट रचत आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांचं नाव या कटामध्ये असल्याचं सिसोदिया म्हणाले.मनोज तिवारी यांना अटक करा, अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही सिसोदिया यांनी सांगितलं.'भाजपने केजरीवाल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न सफल होत नाहीत म्हणून मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांना धमकी दिली आहे. त्यावरुन अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही याची तक्रार करणार आहोत. मनोज तिवारी यांना अटक करुन त्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.'' असं सिसोदिया म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषदेतून हे आरोप केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने