मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर सुनक यांच्यावर टीका

 लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सर गॅविन विल्यम्सन यांनी आज पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाच्या सहकाऱ्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना योग्य वागणूक देत नसल्याची टीका विल्यम्सन यांच्यावर झाली होती. याबाबत चौकशी सुरु असतानाच त्यांनी आपला राजीनामा ट्विटरवर प्रसिद्ध केला. गॅविन विल्यम्सन हे राज्यमंत्री असले तरी त्यांच्याकडे कोणत्याही खात्याची जबाबदारी नव्हती. त्यांचा राजीनामा दु:खी अंतकरणाने स्वीकारत असल्याचे पंतप्रधान सुनक यांनी जाहीर केले.यावरून सुनक यांच्यावर विरोधकांनी टीका सुरु केली आहे. विल्यम्सन यांची मंत्रिमंडळात निवड करण्याच्या एक दिवस आधीच त्यांच्यावरील आरोपांची माहिती सुनक यांना देण्यात आली होती. तरीही सुनक यांनी त्यांची निवड केली. यावरून सुनक यांना पारख नसल्याचे सिद्ध होत असल्याची टीका मजूर पक्षाने केली आहे. पंतप्रधानपद मिळविण्यासाठी सुनक यांनी बंद दाराआड अनेक आश्‍वासने दिली असून त्यातूनच अशा गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींची निवड करावी लागली, असाही दावा मजूर पक्षाने केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने