सामना टीम इंडिया विरुद्ध इंग्लंडचा अन् चर्चा शाहिदच्या बायकोची

मुंबई : टीम इंडिया वि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 168 धावा केल्या आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील टॉस इंग्लंड संघाने जिंकला आणि टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजीस बोलावले. मात्र इंडियाची सुरूवात खराब झाली. मात्र, क्रिकेट जगतात अभिनेता शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूतची. फायनलसाठी टीम इंडिया वि इंग्लंड यांच्यात अतीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. या सामन्यात टी इंडियाने फायनलचे तिकीट पक्के केले तर फायनलचा थरार पाकिस्तानसोबत रंगणार.दरम्यान, जगभरातून या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच शाहिद कपूर याची पत्नी मीर राजपूतची एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. तिनं इंस्टाग्रामवर विराट कोहीलाच बॅटिंग करत असलेला फोटो पोस्ट केला आहे. आणि 'कम ऑन इंडिया'. शाहिद कपूर आणि संपूर्ण कुटुंबासह मीरा राजपूत टीम इंडियाला प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहे.इंग्लंड आणि भारत यांच्यात जो विजेता संघ ठरेल त्या संघाचा मुकाबला टी20च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाशी मुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने याआधीच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवत फायनलची फेरी गाठली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने