राहुल गांधींच्या सभेठिकाणी निघालेल्या संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंना रोखलं! मनसे आक्रमक

बुलढाणा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरुन आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. राहुल गांधींची सभा होणाऱ्या शेगावकडे ते निघाले असताना त्यांना पोलिसांनी बुलढाण्यातील चिखली इथं अडवलं, त्यामुळं या नेत्यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठिय्या मांडला. यावेळी राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या. राहुल गांधी यांची आज शेगाव इथं जाहीर सभा होणार आहे. दरम्यान, बुलढाण्यातून शेगावकडं जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे फ्लेक्स लावले आहेत. हे फ्लेक्स मनसेच्या कार्यकर्त्यांनी फाडले आहेत. त्याचबरोबर आम्हाला शेगावला जाण्यापासून का रोखलं जात आहे असा सवाल मनसेच्या नेत्यांकडून केला जात आहे. तसेच आम्ही शेगावला जाणारचं असं त्यांनी म्हटलं आहे.राहुल गांधींच्या शेगावच्या सभेत गोंधळ होणारच - अविनाश जाधव

अविनाश जाधव म्हणाले, "ज्या पद्धतीनं पोलीस वागत आहेत आणि काँग्रेस नेते घाबरले आहेत. जरी नेत्यांना अडवलं असलं तरी आमचे महाराष्ट्र सैनिक थांबणार नाहीत" राहुल गांधींच्या सभेत गोंधळ होणारचं असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आमच्या माणसांचा अपमान करणाऱ्या अतिशय फालतू माणसाचे बॅनर आम्ही फाडले आहेत, अशा शब्दांत राहुल गांधींवर जाधव यांनी टीका केली.

मनसे नेते पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, राहुल गांधींच्या सभेठिकाणी निघालेल्या मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांना बुलढाण्याच्या चिखलीच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना ठेवण्यात आलं आहे. या नेत्यांमध्ये प्रकाश महाजन, अविनाश जाधव, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि काही स्थानिक नेत्यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने