"हा अपघात ईश्वराची इच्छा" ओरेवा कंपनीच्या मॅनेजरचे धक्कादायक विधान

गुजरात: गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १३५ जणांनी जीव गमावला आहे. दरम्यान, दुर्घटनेत इतक्यात मोठ्या प्रमाणात जीवीतहानी होण्याचं नेमकं काय कारण असा सवाल उपस्थित होत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने अजब वक्तव्य केलं आहे. ईश्वराची इच्छा असल्याने अपघात झाल्याचे पारेख यांनी म्हटलं आहे. या अपघातप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. त्यापैकी ओरेवा कंपनीचा व्यवस्थापक दीपक पारेख याने मुख्य मॅजिस्ट्रेट आणि अतिरिक्त वरिष्ठ सिव्हिल न्यायाधीश एम. जे. खान यांच्यासमोर आपला जबाब नोंदवला. त्यावेळी पारेख याने धक्कादायक विधान केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने