शाहरुखच्या 'पठाण'ला नेटकऱ्यांचा हिसका, 'बॉयकॉट'चा दणका

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा दोन दिवसांपूर्वी मोठ्या धुमधडाक्यात वाढदिवस साजरा झाला. बर्थ डेच्या निमित्तानं त्यानं आपल्या बहुचर्चित अशा पठाण चित्रपटाचा टीझर व्हायरल केला. लाडक्या शाहरुखच्या चित्रपटाचा टीझर म्हटल्यावर त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांनी शाहरुखचे तोंडभरून कौतूक केले. नाही म्हटलं तरी तब्बल दोन वर्षांच्या ब्रेकनंतर त्याची मुख्य भूमिका असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.यासगळ्यात शाहरुखचा पठाण आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर नेटकरी, आणि प्रेक्षक बॉलीवूडबाबत भलतेच सक्रिय झाले आहेत. त्यांनी तर बॉलीवूड आणि टॉलीवूड अशी स्पर्धा लावून टाकली आहे. मात्र यासगळ्यात अनेकांनी शाहरुखच्या नव्या चित्रपटाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हा चित्रपट पाहायचा नाही. असे त्यांनी सोशल मीडियावर सांगितले आहे. त्यामुळेच की काय आता बॉयकॉट पठाण असा ट्रेंड पाहायला मिळतो आहे.

नेटकऱ्यांनी यापूर्वी असा दणका आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढाला आणि अक्षय कुमारच्या रक्षाबंधनला दिला होता. हे दोन्ही बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले होते. आमिरनं तर नेटकरी, प्रेक्षक यांची जाहीर माफीही मागितली होती. मात्र आमिरच्या काही वक्तव्यांबद्दल असलेला राग, यामुळे नेटकऱ्यांनी आक्रमक होत आपली ताकद त्यांना दाखवून दिली होती. आता तोच प्रकार शाहरुखच्या पठाणबाबत होताना दिसतो आहे. त्यामुळे येत्या काळात शाहरुखला देखील सावध राहावे लागणार आहे.शाहरुखच्या पठाणचा टीझर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यातील अनेक चुकांवर बोट ठेवले आहे. खासकरुन त्यातील ग्राफीक्स त्यांना आवडलेले नाहीत. त्यावर त्यांनी सडकून टीकाही केली आहे. २५ जानेवारी २०२३ ला शाहरुखचा पठाण हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र आताच सुरु झालेल्या बहिष्काराच्या मागणीनं परिस्थिती बिकट असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम आणि प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने