'मी तिला एकदाच मुबंईत भेटलो आणि...', जॅकलिनविषयी फ्रेंच संगीतकाराची मोठी कबुली

मुंबई : सनशाईन गर्ल जॅकलीन फर्नांडिस तिचा अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखली जात असून, तिचे चाहते जगभरात पसरलेले आहेत. आता या फॅन क्लबमध्ये सुप्रसिद्ध संगीत निर्माता आणि डीजे असलेल्या डीजे स्नेक चे नाव सामील झाले आहे. त्यानं जॅकलिनविषयी मोठी कबुली दिली आहे.डीजे स्नेक हा एक सुप्रसिद्ध फ्रेंच संगीत निर्माता आणि डीजे आहे ज्याने नेहमीच आपल्या संगीताने चाहत्यांना वेड लावले आहे. एका मुलाखतीदरम्यान, त्याला कोणासोबत काम करायला आवडेल असे विचारले गेले होते. तेव्हा तो म्हणाला, "मी भारतीय अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा प्रचंड चाहता आहे आणि मला भविष्यात तिच्यासोबत काम करायला आवडेल."तो पुढे म्हणाला, “रणवीर सिंग हे देखील एक नाव आहे ज्याच्यासोबक काम करण्यास मी उत्सुक आहे. मी आता काही भारतीय संगीतकारांच्या संपर्कात आहे आणि आम्ही काही रोमांचक संकल्पनांवर एकत्रित काम करण्याच्या दृष्टीने चर्चा करत आहोत."

जॅकलीन निश्चितपणे डीजे स्नेकच्या फेव्हरेट लिस्टमध्ये अव्वलस्थानी आहे. पुढे तो म्हणाला, "मला जॅकलीन फर्नांडिसला एकदा मुंबईत भेटण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर मी तिचा खूप मोठा चाहता बनलो. याशिवाय, मी शाहरुख खानचा देखील खूप मोठा चाहता आहे'', असेही तो म्हणाला.जॅकलीनच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर नुकतीच 'राम सेतू' मध्ये ती दिसली होती तर तिच्याकडे सध्या 'सर्कस' हा मोठा सिनेमा आहे आणि अलीकडेच 'क्रॅक' ची देखील घोषणा केली गेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने