नागाचैतन्यचा घटस्फोटानंतर १ वर्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार,चर्चेला उधाण...

मुंबईः  दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री 'ऊ अंटावा गर्ल' समंथा रुथ प्रभू सध्या बरीच चर्चेत आहे. तिनं काही दिवसांपूर्वीच आपल्या आजाराविषयी मोठा खुलासा केला होता. तिच्या आजाराविषयी जाणून घेतल्यानंतर तिचे चाहते मात्र चिंतेत पडले होते. असंही कळत होतं की तिचा पूर्वाश्रमीचा पती अभिनेता नागाचैतन्य आणि सासरे अभिनेते नागार्जुन तिची विचारपूस करण्यासाठी तिला भेटले होते. नागाचैतन्य आणि समंथा यांनी फोनवरनं देखील संवाद साधला. बोललं जात आहे की नागाचैतन्य आणि समंथा पुन्हा एकदा आपल्यातील वाद विसरुन एकत्र येत आहेत. एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार,समंथा रुथ प्रभू आणि नागाचैतन्य दोघे घटस्फोटानंतरही एकमेकांचे चांगले मित्र बनून राहिले आहेत. आपल्यातील वैयक्तिक वाद बाजूला ठेवत व्यावसायिक पातळीवर एकत्र काम करायला त्यांना काहीच हरकत नाही. नागाचैतन्य आणि समंथानं याआधी अनेक सिनेमांतून एकत्र काम केले आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांनाही आवडते.समंथा समंथा काही दिवसांपूर्वी 'कॉफी विथ करण ७' या चॅट शो मध्ये आली होती. तिनं अक्षय कुमारसोबत काऊच शेअर केलेला आपण सर्वांनीच कदाचित पाहिलं असेल. या शो मध्ये तिनं नागाचैतन्य सोबतच्या आपल्या तुटलेल्या नात्यावर भाष्य केलं होतं. या शो नंतर समंथा सोशल मीडियावरनं गायब झाली होती. तिचं सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही कार्यक्रमात हजेरी लावणं बंद झालेलं दिसून आलं. त्या दरम्यान बातमी समोर आली ती तिच्या आजाराची. परदेशात ती इलाज करायला गेल्याचं देखील कळालं.आणि नागाचैतन्य यांनी २०१० मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. २९ जानेवारी २०१७ मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर समंथानं सोशल मीडियावर आपल्या नावासोबत अक्किनेनी हे नागाचैतन्यचे आडनावही जोडलेले सर्वांनी पाहिले. पण यानंतर २ ऑक्टोबर २०२१ ला दोघांनी आपण विभक्त होत असल्याचं जाहीर केलं.यानंतर समंथानं सोशल मीडियावरनं चाहत्यांशी स्वतः संवाद साधत सांगितलं की ती ऑटो-इम्यून मायोसिटिस या आजाराशी झुंज देत आहे. या बातमीनं तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.तिच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर विजय देवरकोंडासोबत 'खुशी' सिनेमात ती लवकरच दिसणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने