“बलात्कार करण्यासाठी…”, साजिद खानवर मॉडेल नम्रता सिंहचे गंभीर आरोप

मुंबई : बिग बॉस हिंदी’च्या यंदाच्या पर्वात बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान सहभागी झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासूनच अनेक अभिनेत्री त्याच्यावर आरोप करत आहेत. शर्लिन चोप्रासह इतर अभिनेत्रींही साजिदवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. मीटू प्रकरणात अडकलेल्या साजिदवर आता आणखी एका मॉडेलने गंभीर आरोप केला आहे. मॉडेल नम्रता शर्मा सिंहने साजिदने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे.नम्रता शर्माने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. “साजिदने १०-११ वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार करण्याची पूर्ण तयारी केली होती. त्याने मला एका चित्रपटाच्या मानधनाबद्दल बोलण्यासाठी ऑफिसमध्ये बोलवलं होतं. त्याच्या ऑफिसमध्ये एक सोफा होता आणि दोन-तीनच माणसे होते. त्याने मला ऑफिसमधील एका रुममध्ये नेलं. सगळ्यांसमोर मानधनाबद्द्ल त्याला बोलायचं नसेल, हा विचार करुन मी रुममध्ये गेले.”, असा खुलासा नम्रताने मुलाखतीदरम्यान केला.

नम्रता पुढे म्हणाली, “रुममध्ये जाताच साजिदने दरवाजा बंद केला. साजिदच्या ऑफिसमध्ये गेले तेव्हा मी शॉर्ट ड्रेस घातला होता. रुममध्ये साजिदने चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श करायला सुरुवात केली. साजिद माझ्यावर बलात्कार करण्याच्या तयारीतच होता”. साजिदला बिग बॉसच्या घरात पाहून त्या प्रसंगाची पुन्हा आठवण झाल्याचं नम्रताने सांगितलं.दरम्यान बिग बॉसमधून साजिद खानची हकालपट्टी करण्यासाठी शर्लिन चोप्राने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहीलं होतं. साजिद खानविरोधात शर्लिनने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने