नार्को टेस्ट म्हणजे काय? ही टेस्ट कशी केली जाते?

दिल्ली: सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला जातोय. आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनरची निर्घृण हत्या केली आणि देशभरात या विरोधात एकच आक्रोश उठला. सध्या या प्रकरणात दर दिवशी नवनवे खुलासे होत आहे.सध्या आरोपी आफताब या प्रकरणात नवी नवीन गोष्टींची कबूली देत आहे पण आफताब पोलिसांना फसवूही शकतो. त्यामुळे त्याची नार्को टेस्ट केली जाणार आहे. पण तुम्हाला माहिती आहे का नार्को टेस्ट म्हणजे काय? आणि ती कशी केली जाते? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
नार्को टेस्ट म्हणजे काय?

नार्को टेस्ट ही एक अशी टेस्ट आहे, जे पडद्यामागील परखड सत्य समोर आणते. जेव्हा आरोपीकडून सत्य जाणून घ्यायचं असतं त्यावेळी नार्को टेस्ट केली जाते. ही टेस्ट करत असताना तेथे फॉरेन्सिक तज्ञ, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ उपस्थित असतात.या नार्को टेस्टमध्ये आरोपीला काही औषधी दिली जातात, ज्यामुळे त्याचा ब्रेन सुस्त होतो ज्यामुळे आरोपीचे फार बुद्धीने विचार करण्याची क्षमता कमी होते आणि तो खरं बोलायला लागतो. पण प्रत्येकवेळी आरोपी नार्को टेस्टमध्ये खरं बोलेल, याची शक्यता नसते. कधी कधी ही नार्को टेस्ट फेल सुद्धा होऊ शकते.

नार्को टेस्ट कशी केली जाते?

  • नार्को टेस्टमध्ये आरोपीला “ट्रुथ ड्रग” नावाचे औषध किंवा “सोडियम पेंटोथल किंवा सोडियम अमाईटल”चे इंजेक्शन दिले जाते.

  • यामुळे आरोपीचा ब्रेन सुस्त होतो.

  • आरोपीची बौद्धीक क्षमता दूर होते.

  • अशा अवस्थेत आरोपी खरं बोलण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे नार्को टेस्ट ही प्रामुख्याने केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने