अफताबची आज नार्को टेस्ट नाहीच! अधिकाऱ्यांनी दिली महत्वाची माहिती

दिल्ली : लिव्ह इन मधील पार्टनरची निर्घृणपणे हत्या केल्यानं देशभरात चर्चेत आलेल्या श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी तिचा मित्र अफताब याची आज नार्को टेस्ट होणार असल्याची चर्चा होती. पण ही टेस्ट आज होणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या टेस्टनंतर अफताबनं नक्की काय गोष्टी केल्या हे समोर येण्याची शक्यता आहे. अफताबची नार्को टेस्ट होणार नसल्याचं या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आज अफताबची नार्को टेस्ट होणार नाही. यावर दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण आलं आहे. यावर लवकरच आमच्या संचालकांचे देखील आदेश येतील. आमची टीम ३ दिवसांपासून यासाठी काम करतोय. पण नार्कोटेस्ट करण्यापूर्वी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्या पूर्ण झाल्यानंतर श्रद्धा मर्डर केसमधील आरोपी अफताबची नार्को टेस्ट केली जाईल, अशी माहिती फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे (FSL) सहाय्यक संचालक संजीव गुप्ता यांनी दिली आहे.
नार्कोपूर्वी पॉलिग्राफ टेस्ट गरजेची

फॉरेन्सिक सायकॉलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख पी. पुरी यांनी सांगितलं की, नार्को टेस्टपूर्वी पॉलिग्राफ टेस्ट करणं गरजेचं आहे. यासाठी आम्हाला याच्या संमतीची गरज आहे. कोर्टानं नार्को टेस्टसाठी परवानगी दिली आहे. पण अद्याप आम्ही पॉलिग्राफ टेस्टच्या परवानगीसाठी थांबलो आहोत. एकदा आम्हाला यासाठी परवानगी मिळाली की, येत्या दहा दिवसांत सर्व चाचण्या पूर्ण होतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने