'वंदे मातरम'ला 'जन गण मन'सारखाच दर्जा; उच्च न्यायालयाच्या याचिकेला मोदी सरकारचं उत्तर

दिल्ली : राष्ट्रीय गीत जन गण मन आणि वंदे मातरमला समान दर्जा असून नागरिकांनी दोन्हींचा आदर राखला पाहिजे. दिल्ली उच्च न्यायालयातदाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर उत्तर देताना केंद्र सरकारनं  ही माहिती दिलीय.'जन गण मन'सारखा वंदे मातरमलाही राष्ट्रगीताचा दर्जा आणि सन्मान मिळायला हवा, अशी मागणी या अर्जात करण्यात आली होती. याशिवाय, राष्ट्रगीताच्या आदराबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणीही करण्यात आली. त्यावर उच्च न्यायालयानं गृह मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, सांस्कृतिक मंत्रालय आणि कायदा मंत्रालयाला नोटीस बजावून त्याचं उत्तर मागवलं होतं.शाळा आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्येक कामकाजाच्या दिवशी जन गण मन आणि वंदे मातरम हे गीत गायलं जावं, असा आदेश केंद्र आणि राज्य सरकारांना द्यावेत, अशी मागणीही या अर्जात करण्यात आलीय. याशिवाय, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेत पारित झालेल्या ठरावानुसार, दोन्हींच्याही सन्मानासाठी मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करावीत. याचिकाकर्ते अश्विनी कुमार उपाध्याय म्हणाले, 'भारत हा राज्यांचा संघ आहे. हा महासंघ नाही. आमचं एकच राष्ट्रीयत्व आहे आणि ते म्हणजे भारतीयत्व! वंदे मातरमचा आदर करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.'देशाला एकसंध ठेवायचं असेल तर जन गण मन आणि वंदे मातरमचा आदर व्हावा, यासाठी राष्ट्रीय धोरण ठरवणं ही सरकारची जबाबदारी आहे, असंही ते म्हणाले. याचिकाकर्त्यानं पुढं म्हटलंय की, वंदे मातरमनं कोणाच्याही भावना कशा दुखावल्या जाऊ शकतात, हे समजण्यासारखं नाही. तर, या दोन्हींची निवड संविधानकर्त्यांनी केलीय. जन गण मनमध्ये राष्ट्राची भावना समोर येते. त्याच बरोबर वंदे मातरम् हे राष्ट्राचं चारित्र्य, जीवनशैली यांची अभिव्यक्ती आहे. प्रत्येक भारतीयानं वंदे मातरमचा आदर करणं आवश्यक आहे. कोणी वंदे मातरम गाण्यास नकार दिला असं होऊ शकत नाही, असंही त्यांनी नमूद केलंय. रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 मध्ये कलकत्ता इथं झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम गायलं होतं. यानंतर 1901 मध्ये काँग्रेस अधिवेशनात दक्षिण चरण सेन यांनीही वंदे मातरम गायलं. इतकंच नाही, तर 1905 मध्ये बनारसमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनात पुन्हा एकदा सरला देवींनी वंदे मातरम गायलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने