अमिताभला 'नॉटी' म्हणू लागलेयत लोक, एका फोटोनं उडवली खळबळ

मुंबई :  अमिताभ बच्चन अभिनेता म्हणून ग्रेट आहेत हे वेगळं सांगायची गरज नाहीच,पण त्याहीपेक्षा त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूप ग्रेट आअहे हे अनेकदा त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहिल्या की लक्षात येते. सोशल मीडियावर ते खूपच सक्रिय पहायला मिळतात. अनेकदा त्यांचे मजेदार ट्वीट्स आणि पोस्ट्स चाहत्यांचे मनसोक्त मनोरंजन करताना दिसतात. नुकतीच अमिताभनी एक पोस्ट शेअर केली आहे,जी पाहिल्यानंतर लोकांनी चक्क त्यांना 'नॉटी' म्हणणं सुरू केलं आहे.
अमिताभ बच्चननी ट्वीटर हॅंडलवर आपले दोन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते चक्क जीभ दाखवत पोझ देताना दिसत आहेत. त्या फोटोला अमिताभनी कॅप्शन दिले आहे ते वाचल्यानंतर मात्र चाहत्यांनी त्यांची फिरकी घ्यायला सुरुवात केली आहे. अमिताभ बच्चन यांचे ट्वीट जोरदार व्हायरल झालं आहे आणि यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.अमिताभ बच्चननी ट्वीट केलं आहे की, ''अनेकदा व्यक्त व्हायला(जीभेला) शब्दांची गरज नसते, कितीतरा वेळा शब्दांविना खूप गोष्टी एखादा फोटो(जीभेचा) बोलून जातो''. अमिताभच्या ट्वीटवर काही नेटकऱ्यांनी अमिताभना ट्रोल करायला तर काहींनी त्यावर मजेदार कमेंट करायला सुरुवात केली आहे. एकानं लिहिलं आहे,'तुमच्यापेक्षा तुमच्या बायकोची जीभ तिखट आहे...बोलायला लागली तर...,तुमच्या जीभेत दम नाही'. तर दुसऱ्या एकानं लिहिलं आहे,'काय नॉटी बोलत आहात सर...', तर आणखी एकानं चक्क 'नॉटी अमित जी' असंच म्हटलं आहे.

अमिताभ सध्या 'कौन बनेगा करोडपती' या शो सोबतच सिनेमाच्या शूटिंगमध्ये देखील व्यस्त आहेत. पण एवढं बिझी शेड्युल असूनही अमिताभ सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी वेळ काढतातच.अमिताभचे चाहते देखील त्यांच्या पोस्टचा आनंद लुटताना दिसतात. अमिताभ न चुकता ब्लॉगही लिहितात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. अमिताभनी काही दिवसांपूर्वीच आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. पण या वयातही त्यांचा काम करण्याचा उत्साह पाहण्यासारखा आहे.अमिताभच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर अमिताभ नुकतेच आपल्याला 'गूडबाय' सिनेमात दिसले होते. सध्या त्यांच्याकडे ६ सिनेमे आहेत जे लवकरच रिलीजच्या वाटेवर आहेत. या सिनेमांमध्ये 'उंचाई;,'गणपत','घूमर','द उमे क्रॉमिकल्स', 'बटरफ्लाय' आणि 'प्रोजेक्ट के' यांचा समावेश आहे. यावर्षी अमिताभ बच्चन 'गूडबाय' व्यतिरिक्त 'ब्रह्मास्त्र','रनवे ३४','झुंड','राधे श्याम' आणि 'चुप- रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' सिनेमात दिसले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने