केसात गुलाब, मांडीपर्यंत वर केलेला गाऊन अन कातील नजर.. भूमीचा 'गोविंदा' लुक

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणून भुमीचं नाव घ्यावं लागेल. गेल्या काही दर्जेदार चित्रकपटांमुळे भूमी पेडणेकर प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री झाली आहे. तिनं वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत भुमिनं वेगळा माईलस्टोन सेट केला आहे. तिच्या बरोबरीच्या अभिनेत्रींना तिनं मागे सोडत स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज भूमिका 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटातील पहिला लुक समोर आला. तिचा हा लुक पाहून सर्वांचेच भान हरपले आहे.
बॉलीवूड सुपरस्टार विकी कौशल , भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी हे तीन दमदार कलाकार 'गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात एकत्र येणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले असून हा चित्रपट बराच चर्चेत आला आहे. या चित्रपटात विकी 'गोविंदा वाघमारे'च्या भूमिकेत आहे तर भूमी ''गौरी वाघमारे''च्या म्हणजेच त्यांच्या बायकोच्या भूमिकेत आहे. तर कियारा आडवाणी त्यांच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. गोविंदाची नॉटि गर्लफ्रेंड आणि हॉटी वाईफ असा या चित्रपटाचा कथाभाग आहे.

भूमी पेडणेकरने तिच्या इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. भूमीने एक हटके फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये भूमीने लेंवेंडर कलरच्या नाईट गाऊन मध्ये दिसत आहे. यावेळी मांडीपर्यंत वर घेतलेला गाऊन, डोक्यात लाल गुलाब, हातात बशी, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या आणि मादक नजर असा तिचा किलर लुक समोर आला आहे. शिवाय "गोविंदा की हॉटी वाईफ" असे कंपक्षण तिने दिले आहे.‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटांमध्ये विकी कौशल एका डान्सरची भूमिका पार पडणार आहे. चित्रपटांमध्ये त्याला पत्नीशिवाय एक गर्लफ्रेंड देखील आहे. ही एका डान्सरच्या संघर्षाची कथा आहे. या चित्रपटात विकी कौशल, भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहे. येत्या १६ डिसेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टार वर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने