मृणाल कुलकर्णी यांच्या लेक व सूनेने सुरू केला नवा व्यवसाय, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

मुंबई : अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेचा विवाहसोहळा काही महिन्यांपूर्वी पार पडला. या दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम प्रत्येक व्हिडीओ तसेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसून येतं. शिवानी-विराजस कलाक्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. आता याव्यतिरिक्त दोघांनी एक नवी सुरुवात केली आहे. सतत काही ना काही नवं करण्याच्या शोधात असणाऱ्या या कपलने आता नवा व्यवसाय सुरु केला आहे.शिवानी-विराजसने अभिनयक्षेत्रात उत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाबरोबरच स्वतःचा व्यवसाय असावा म्हणून दोघांना एक भन्नाट कल्पना सुचली. शिवानी व विराजसने सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ शेअर करत नवा व्यवसाय सुरु केला असल्याचं सांगितलं आहे.दोघांनी ‘विरानी’ नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे. या ब्रँडची खासियत म्हणजे फक्त नाटक प्रेमींसाठी या ब्रँड अंतर्गत खास टी-शर्ट तयार करण्यात येणार आहेत. ‘रफु चक्कर’ या ब्रँडबरोबर त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. ‘रफु चक्कर’च्या वेबसाईटवर ‘विरानी’चे टी-शर्ट तुम्हालाही खरेदी करता येणार आहेत.नाटकप्रेमींना लक्षात घेत शिवानी-विराजसने हा ब्रँड सुरु केला आहे. शिवाय या टी-शर्ट्सवर शांतता ठेवा नाटक सुरु आहे असे अनेक मॅसेज लिहिण्यात आले आहेत. शिवानी व विराजसच्या या नव्या व्यवसायाला त्यांचे चाहते तसेच सेलिब्रिटी मंडळी शुभेच्छा देत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने